हात जोडतो, आतातरी जागे व्हा; नाशिक दुर्घटनेनंतर प्रविण दरेकर हळहळले
हात जोडतो, आतातरी जागे व्हा; नाशिक दुर्घटनेनंतर प्रविण दरेकर हळहळले
नाशिक : नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळेर राज्यात खळबळ उडाली असून विरोधकांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. ठाकरे सरकार कोरोना महामारीला हातळण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी नाशिक येथे दुर्घटनाग्रस्त रुग्णालयास भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना हा आरोप केला.