तेव्हा ते मातोश्रीवर बसून होते, प्रविण दरेकरांचा औरंगाबाद दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

| Updated on: Oct 23, 2022 | 2:57 PM

आज उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई : आज उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावरून वातावरण चांगलचं तापलं आहे.  शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. उशिरा का होत नाही पण उद्धव ठाकरे यांना शाहानपण सूचलं. ज्यावेळी हाती सत्ता होती, तेव्हा त्यांना बाहेर फिरण्यास वेळ नव्हता, लोकांना भेटण्यास वेळ नव्हता, तेव्हा ते फक्त मातोश्रीवर बसून होते असं दरेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.  अंबादास दानवे हे अपरिपक्व नेते असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

 

 

Published on: Oct 23, 2022 02:57 PM
मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही पुलावरून नदीत उडी मारून जीव द्यावा का?, ठाकरेंच्या दौऱ्याआधी शेतकऱ्याचा टाहो…
“प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या”, उद्धव ठाकरे यांचं शिंदे सरकारला आवाहन