Video : तर सोमय्यांची हत्याच झाली असती- प्रवीण दरेकर

| Updated on: Apr 27, 2022 | 2:28 PM

किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर 60 ते 70 जणांच्या जमावाने हल्ला केला. केवळ सीआयएसएफचे जवान होते म्हणून सोमय्यांचा जीव वाचला. नाही तर कदाचित त्याच ठिकाणी सोमय्यांची हत्या झाली असती, असा गंभीर दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी केला आहे. आम्ही गृहमंत्री, गृहसचिवांकडे गेलो असतो. पण ते न्याय देतील असं वाटलं नाही. सरकार […]

किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर 60 ते 70 जणांच्या जमावाने हल्ला केला. केवळ सीआयएसएफचे जवान होते म्हणून सोमय्यांचा जीव वाचला. नाही तर कदाचित त्याच ठिकाणी सोमय्यांची हत्या झाली असती, असा गंभीर दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी केला आहे. आम्ही गृहमंत्री, गृहसचिवांकडे गेलो असतो. पण ते न्याय देतील असं वाटलं नाही. सरकार सुडाने पेटलेले आहे. सोमय्या भ्रष्टाचार काढत आहेत. म्हणूनच त्यांना गायब करण्याचा डाव होता. राज्यपालांकडे (bhagat singh koshyari)  आमची शेवटची आशा आहे. म्हणून त्यांच्याकडे न्याय मागायला आलो. आमचा कायद्यावर विश्वास आहे. कायद्याने झालं नाही तर आम्ही संघर्ष करू. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य सरकारकडून तात्काळ अहवाल मागावा अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.

Nagpur temperature : नागपुरात उष्माघाताचे 3 बळी?
महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगालने इंधनावरील कर कमी करावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी