Video : राज्यपाल ही शेवटची आशा- प्रवीण दरेकर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर प्रवीण दरेकर मीडियाशी संवाद साधत होते. राज्यपालांना भेटलो. सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या मार्फत दहशतवाद केला जात आहे. या गोष्टी राज्यपालांच्या कानावर घातल्या. सोमय्यांनी सर्व सिक्वेन्स सांगितला. एफआयआर खोटा होता. सोमय्यांनी जे सांगितलं त्या व्यतिरिक्त नोंदवून एफआयआर ऑनलाईन केला गेला. तो रद्द करून नवा एफआयआर घ्यायला हवा. सोमय्यांवर 60 ते 70 जणांच्या […]
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर प्रवीण दरेकर मीडियाशी संवाद साधत होते. राज्यपालांना भेटलो. सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या मार्फत दहशतवाद केला जात आहे. या गोष्टी राज्यपालांच्या कानावर घातल्या. सोमय्यांनी सर्व सिक्वेन्स सांगितला. एफआयआर खोटा होता. सोमय्यांनी जे सांगितलं त्या व्यतिरिक्त नोंदवून एफआयआर ऑनलाईन केला गेला. तो रद्द करून नवा एफआयआर घ्यायला हवा. सोमय्यांवर 60 ते 70 जणांच्या जमावांनी हल्ला केला. पण गुन्हा सोमय्यांच्या ड्रायव्हर विरोधात दाखल करण्यात आला. हा प्रकार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असाच आहे. नंतर पोलिसांवर दबाव आला म्हणून नावाला महाडेश्वरांवर गुन्हा दाखल केला. काही तरी कारवाई केल्याचं चित्रं निर्माण केलं आणि त्यांना जामीनही दिला, असं दरेकर म्हणाले. तसंच राज्यपाल ही शेवटची आशा असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.