“सत्ता मिळाल्यावर ठाकरे मुख्यमंत्री,आदित्य ठाकरे पालकमंत्री; ही यांची परंपरा”, भाजप नेत्याची टीका
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. "लोकसभा पोटनिवडणुकीवर संजय राऊत यांनी ट्वीट केलं होतं. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “लोकसभा पोट निवडणूक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल”, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.! “भाजप त्याग करून वर आलेला पक्ष आहे, संजय राऊत यांनी त्यागाची भाषा करू नये. ते स्वतः राजीनामा देऊन दुसऱ्या शिवसैनिकांना संधी देणार आहेत का? सत्ता मिळाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे पालकमंत्री, ही त्यांची त्यागाची परंपरा”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
Published on: May 30, 2023 11:45 AM