संजय राऊत स्वत:ला काय समजतात? त्यांना तात्काळ अटक करा; भाजपच्या आमदाराची विधानपरिषदेत मागणी

| Updated on: Mar 01, 2023 | 12:46 PM

संजय राऊत यांच्या वक्तव्याचे विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही पडसाद पाहायला मिळाले. दरेकरांनी थेट अटकेची मागणी केली आहे. पाहा...

मुंबई : संजय राऊत स्वत:ला काय समजतात? त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. संजय राऊत यांचं विधान हे केवळ सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाबतीतील नाही. तर सभागृहाच्या हक्काचा आहे. कुणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ, असं त्यांना वाटत असेल. तर तसं होणार नाही. सुमोटो दाखल करा. राऊतांना अटक करा, अन्यथा आम्ही सभागृह चालवू देणार नाही, असंही दरेकर म्हणालेत. “एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे”, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काहीवेळाआधी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतलाय.

Published on: Mar 01, 2023 12:40 PM
संजय राऊतांवर बोलता-बोलता भरत गोगावले ‘तो’ आक्षेपार्ह शब्द बोलून गेले, अन् विरोधक भडकले…
संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान- विधानसभा अध्यक्ष