“शिवसेनेची जाहिरात म्हणजे महायुतीचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न”, भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका

| Updated on: Jun 14, 2023 | 7:41 AM

काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या जाहिरातीत देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा होत होती. मात्र शिंदेंच्या जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई : काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या जाहिरातीत देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा होत होती. मात्र शिंदेंच्या जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विरोधकांनी तर फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय आहेत. हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल केला आहे. शिवसेनेच्या या जाहिरातीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “अशा प्रकारच्या शिवसेनेनं जाहिराती केल्या असतील तर ते योग्य नाही. सर्वे हे सर्वे असतात, वेगवेगळ्या संस्थांचे सर्वे होत असतात. मुख्यमंत्री शिंदे यांना चांगलं दाखवलं असेल तर आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. मात्र ते दाखवताना दुसऱ्याला खाली दाखवणं हे युतीचं वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न आहे. रिष्ठांनी याची दखल घेतली पाहिजे. शिंदे- फडणवीस दोघांनी महाराष्ट्राला दिशा द्यायची आहे. एकमेकांना कमी जास्त दाखवण्यासाठी कुणी खतपाणी घालत असेल तर योग्य नाही”, असं प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यावरही प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय जनता पार्टीने त्याग केला म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले”, असं दरेकर म्हणाले.

Published on: Jun 14, 2023 07:41 AM
‘…आता बियाणं निर्मिती कंपन्यांनी काळजी घ्यावी अन्यथा’, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा इशारा
नाराजीनंतर सेना-भाजप युतीची नवी जाहीरात प्रसिद्ध, काय म्हटले या नव्या जाहिरातीत?