“सर्वात जास्त भ्रष्टाचार काँग्रेसच्या काळात झाले”, भाजपचा नाना पटोले यांना टोला

| Updated on: Jun 05, 2023 | 11:06 AM

देशात जनतेची लूट भाजप सरकारने केली आहे, याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. तसेच मुंबई महापालिकेच्या डिपॉझिटवर भाजपचा डोळा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : देशात जनतेची लूट भाजप सरकारने केली आहे, याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. तसेच मुंबई महापालिकेच्या डिपॉझिटवर भाजपचा डोळा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”सर्वात जास्त भ्रष्टाचार आणि घोटाळे काँग्रेसच्या राज्यात झाले.पंतप्रधान मोदी यांना नऊ वर्ष होत आली, एकतरी घोटाळा त्यांनी दाखवावा, असं आव्हान प्रवीण दरेकर यांनी नाना पटोले यांना दिलं आहे. काँग्रेसने या देशाच्या तिजोरीवर दरोडे टाकले. विरोधकांकडे बोलायला काही मुद्दा नाही म्हणून काहीही वक्तव्य करत आहेत. आमचं नेतृत्व भक्कम आहे. म्हणून जनता आमच्यासोबत आहे, असा विश्वास आम्हाला आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले. “तसेच भारतीय जनता पक्षाचे डिपॉझिट एवढे मजबूत आहे की जनतेचा आशीर्वाद हे आमचे डिपॉझिट आहे. मोदींनी कधीही डिपोझिट वर लक्ष ठेवलं नाही. जनतेची सेवा आणि त्या माध्यमांनी मिळणाऱ्या आशीर्वाद हे भाजपाचे डिपॉझिट आहे.पैशांची वाट कोणी लावली , भ्रष्टाचार कोणी केला हे नाना पटोले यांनी बघावं”, असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले.

Published on: Jun 05, 2023 11:06 AM
मुंबईच्या बीचवर जाताय थांबा! अरबी समुद्रात काय होतायत हालचाली? कसला दिला हवामान विभागानं इशारा?
‘… मस्ती आलीय’, शरद पवार यांच्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली