Ramadan Eid : रमजान ईदनिमित्त दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये नमाज पठण

| Updated on: May 03, 2022 | 9:16 AM

गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते, कोरोना काळात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले होते. मात्र आता हे निर्बंध हटवण्यात आल्याने आज देशभरात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी होत आहे.

रमजान ईदनिमित्त दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये आज मुस्लिम बांधवांनी नमाजाचे पठण केले. यावेळी नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी ऐतिहासिक जामा मशिदीमध्ये मोठी गर्दी केली होती. गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दोन वर्ष घरीच रमजान ईद साजरी करावी लागली. मात्र यंदा कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

Published on: May 03, 2022 09:16 AM
Akshaya Tritiya 2022 : 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात खास आरास
‘भाजपचं उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडलं’; सामनामधून राज ठाकरेंचा समाचार