राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने झोडपले, कुठं शेतीचं नुकसान, तर कुठं घरांचे पत्रे उडाले
राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ घातलेला आहे. नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे.
महाराष्ट्रात: राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ घातलेला आहे. नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांसह घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तर अमरावती बाजारपेठेला वादळाता तडाखा बसला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याने केळी उत्पादक संकटात आले आहेत.
Published on: Jun 05, 2023 10:47 AM