Washim Pre Monsoon | वाशिममध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

| Updated on: May 19, 2022 | 7:37 PM

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे राज्यातील अनेक भागात आज पाऊस झाला. ज्यात कोल्हापूर, मालेगावसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा समावेश आहे.

वाशिम : जिल्ह्यात उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आज वरून राज्याने थोडासा दिलासा दिला. वाढत्या गरमीने (HeatWave) वाशिमकर हैराण झाले होते. त्यातच आज शहरात मान्सूनपुर्व पावसाने (Monsoon)म्हणजेच वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना गर्मीपासून गारवा मिळला. तर वाशिम शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी मान्सूनपूर्व रिमझिम पाऊस (Rain) सुरु झाला आहे. त्याचबरोबर मालेगावसह जउल्का परिसरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तर मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी बरसल्याने हवेत चांगलाच गारवा जाणवत होता.

 

 

 

Published on: May 19, 2022 07:37 PM
Nitesh Rane: औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही हे संभाजी छत्रपती यांनी ठरवावं- नितेश राणे
Aurangabad | औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करावी : आबासाहेब पाटील