Press Conference: शिवसैनिकांची दिशाभूल करू नका- दीपक केसकर

Press Conference: शिवसैनिकांची दिशाभूल करू नका- दीपक केसकर

| Updated on: Jul 22, 2022 | 1:40 PM

आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलतो तुम्हीसुद्धा आदराने बोला. जो काही निर्णय व्हायचा तो कोर्टात होईल, होर्टाचा निर्णय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे मत आमदार दीपक केसकर (Deepak keskar) यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिसेनेकडून शिंदे गटावर आरोपांच्या फैरी सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाकडून आमदार दीपक केसकर यांनी पत्रकार परिषद […]

आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलतो तुम्हीसुद्धा आदराने बोला. जो काही निर्णय व्हायचा तो कोर्टात होईल, होर्टाचा निर्णय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे मत आमदार दीपक केसकर (Deepak keskar) यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिसेनेकडून शिंदे गटावर आरोपांच्या फैरी सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाकडून आमदार दीपक केसकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसैनिकांची दिशाभूल करू नये अशी विनंती त्यांनी केली. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून काल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर आरोप केले होते. सोडून गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती असे आदित्य ठाकरे काल म्हणाले.

Published on: Jul 22, 2022 01:40 PM
शिवसेनेसाठी अनेकांनी आयुष्य समर्पित केले- दीपक केसकर
Shivsena: सुहास कांदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आरोप करत आहेत- आमदार अंबादास दानवे