शेतकऱ्या पाठोपाठ आता बायगतदार घायकुतीला; बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली मात्र दर पडला?
परभणीचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. पण टोमॅटो आणि मिरची आधार देईल असं वाटतं असतानाच त्यांच्याही दरात चांगलीच घसरण पहायला मिळाली. तोच दुधाचे भाव ही कोसळले. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
परभणी : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. त्यामुळे परभणीचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. पण टोमॅटो आणि मिरची आधार देईल असं वाटतं असतानाच त्यांच्याही दरात चांगलीच घसरण पहायला मिळाली. तोच दुधाचे भाव ही कोसळले. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. याचदरम्यान आता बागायतदार देखील संकटात आले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे. परभणीच्या बाजारपेठेत सध्या केशर, दशेहरी, नीलम, कलमी, बदाम आणि हापूससह विविध जातीचे आंबे उपलब्ध आहेत. आवक वाढल्याने मात्र आंब्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पावसाळा जवळ येत असल्याने आंब्याचा हंगाम पंधरा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र त्याला दर मिळतना दिसत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यापाठोपाठ बागायतदार देखील संकटात येण्याची शक्यता आहे.