पंतप्रधान मोदी टिळक यांने अभिवादन करताना म्हणाले, ‘स्वातंत्रयुद्धातील त्यांचं समर्पण…’

| Updated on: Aug 01, 2023 | 10:19 AM

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त ही उपस्थित राहणार आहेत. याच्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं आहे.

पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्तेच मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त ही उपस्थित राहणार आहेत. याच्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं आहे. त्यांनी लोकमान्य टिळकांचे धैर्य, त्यांनी दिलेला लढा आणि स्वातंत्रयुद्धातील त्यांचं समर्पण हे देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील असं म्हटलं आहे. त्याचबरोबर मी आज पुण्यात असेन, जिथे मी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार आहे. आपल्या इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्वाच्या कार्याशी संबंध असलेला हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला… याबद्दल मी खरोखरच नम्र आहे. असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Published on: Aug 01, 2023 10:19 AM
अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे येणार? पाहा रवींद्र धंगेकर यांचं सूचक विधान…
“प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा”, रवींद्र धंगेकर यांचा घणाघात