लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत Narendra Modi पुन्हा पहिल्या स्थानी – tv9
अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींना जागतिक नेत्यांमध्ये 75% मान्यता मिळाली आहे.
पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आले आहेत. अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींना जागतिक नेत्यांमध्ये 75% मान्यता मिळाली आहे. तर या सर्वेक्षणात महासत्ता देश असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा टॉप 10 मध्ये देखील समावेश नाही. तर पंतप्रधान मोदींनंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 63 टक्के आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी 54 टक्के रेटिंगसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताचे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता ही जागतिक पातळीवर प्रचंड असल्याचेच येथे पहायला मिळत आहे.