पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा डोळा कुणावर? शिवसेना नेत्यांनी स्पष्टच सांगितलं…
नागपूर महापालिका फडणवीस यांच्या ताब्यात होती. ती आर्थिक डबघाईला आली. पिंपरी चिंचवड महापालिका पाच वर्ष जनतेने विश्वासाने दिली. पण, तेथेही मोठ्या प्रमाणात लूट झाली.
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM NARENDR MODI ) मुंबईत ३७ हजार कोटी कामाचे उदघाटन करण्यास आले होते. मोदी यांचे भाषण ऐकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM DEVENDRA FADNAVIS ) यांचे भाषण ऐकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE ) यांचे भाषण ऐकले. पण, मोदी आणि फडणवीस यांच्या भाषणाचा गाभा एकच होता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यांनी जवळपास ९०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला. तो बाहेर आला. दुसरीकडे, स्वतः पंतप्रधान मोदी यांनी मुंबई महापालिकेचा विकास करण्यासाठी आम्ही काय देणार याबद्दल अवाक्षरही काढले नाही.
गेली २५ वर्ष मुंबई महापालिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात होती. त्या काळात जमा करून ठेवलेली ठेव रक्कम सुमारे ९९ हजार कोटी इतकी आहे. त्याच ठेवीवरून पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री बोलले. यामुळे महापालिकेच्या पैशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली.