पंतप्रधान मोदी यांच्यावर राऊत यांचा घणाघात; म्हणाले, ‘लूट आणि झूठ पहायचं असेल तर येथे या…’
गेहलोत सरकारने भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याची टीका केली. तर गेहलोत यांनी हे करत स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानमधील एका रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला ‘लुटीचे दुकान’ आणि ‘लबाडीचा बाजार’ म्हटलं होतं. तसेच राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार जाणार असे ते म्हणताना, गेहलोत सरकारने भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याची टीका केली. तर गेहलोत यांनी हे करत स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच काँग्रेसवर हल्ला चढवताना, काँग्रेसचा एकच अर्थ आहे… ‘लूटाची दुकान’ आणि ‘लबाडीचा बाजार’. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी मोदी यांच्यावर टीका करताना, लूट आणि झूठ की दुकान क्या है हे पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन पाहावं. मोदी जे काँग्रेसबद्दल बोलत आहेत ते चुकीचं आणि त्यांच्याबाबतीतच बोलत आहेत. चुकून मोदींनी काँग्रेसचं नाव घेतलं असेल. लूट आणि झूठची दुकानं काँग्रेसची नव्हे तर भाजपची असल्याची टीका राऊत यांनी केली.