‘घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते’, सामना अग्रलेखातून मोदी यांच्यावर टीकास्त्र

| Updated on: Aug 17, 2023 | 11:06 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जोरदार भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाना साधला होता. त्यावरून आता सामनाच्या अग्रलेखातून निशाना साधण्यात आला आहे.

मुंबई :17 ऑगस्ट 2023 | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्ली येथे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या १४० कोटी जनतेला शुभेच्छा दिल्या होत्या. तर विरोधकांवर त्यांनी निशाना साधला होता. त्यांनी केलेल्या त्या टीकेवर आता ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. सामनाच्या या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी, मोदींवर निशाना साधताना, सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री हे एकाच राज्याचे आहेत. तर याच्याआधी पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते. त्यामुळे आपल्याच हातात देशाची सत्ता राहावी अशी त्यांची धारणा होती. त्यांचा हा उदात्त हेतू होता. हा हेतू घराणेशाहीचेच रूप आहे अशी टीका करण्यात आली आहे. तर देशातील न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, राष्ट्रपती वगैरे घटनात्मक संस्था आज दहशतीच्या टाचेखाली आहेत. घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते. तर आज लाल किल्लाही भयग्रस्त व अस्वस्थ असणार. त्यामुळे ‘लाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहे’ असेल अशी लाल यादवांची भविष्यवाणी आहे.

Published on: Aug 17, 2023 11:06 AM
शरद पवार यांनी फोटो न वापरण्यावरून तंबी दिल्यानंतर ही राष्ट्रवादीचा हा मंत्री ठाम, म्हणतो, ‘फोटो वापरणारच’
मंत्रीपदावरून नाराज असणाऱ्या भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आमदारांनी मंत्रिपदासाठी शिंदे यांना ब्लॅकमेल केलं’