‘एनडीएसला सलग तिसऱ्यांदा जनतेचा जनादेश देईल; जनतेने हे ठरवलेलं आहे’ : पंतप्रधान मोदी

| Updated on: Jul 19, 2023 | 8:14 AM

विरोधकांना थोपविण्यासाठी भाजप प्रणीत एनडीएची बैठक नवी दिल्लीत तर देशातील प्रमुख २६ विरोधी पक्षांची बैठक बंगळूरूमध्ये पार पडली. यावेळी एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला

नवी दिल्ली, 19 जुलै 2023 | देशात काल मंगळवारी दोन मोठ्या राज्यकीय घटना घडल्या. यात विरोधकांना थोपविण्यासाठी भाजप प्रणीत एनडीएची बैठक नवी दिल्लीत तर देशातील प्रमुख २६ विरोधी पक्षांची बैठक बंगळूरूमध्ये पार पडली. यावेळी एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेताना, जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएला जनादेश देण्याचा निर्णय घेतला असून देशात तिसऱ्यांदा भाजपचं सरकार येईल असा एल्गार केला. तर यावेळी बोलताना त्यांनी, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएची मतांची संख्याही विरोधकांच्या मतांपेक्षा अधिक असेल असेही त्यांनी म्हटलं आहे. तर आपल्याला आत्मनिर्भर, विकसीत भारताचं निर्माण हे कराव लागणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर आपल्या शरिराचा एक एक कण आणि एक एक क्षण हा देशासाठी दिला आहे. तर तुमचा आशीर्वाद हा माझी उर्जा आहे.

Published on: Jul 19, 2023 08:14 AM
“किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ भाजपनेच व्हायरल केला”; सुषमा अंधारे यांचा आरोप, सांगितलं कारणही
“जैसी करनी वैसी भरनी…”, किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया