पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चे शतक; राज्यातील 9 जणांना आमंत्रण

| Updated on: Apr 27, 2023 | 9:58 AM

पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे शतक म्हणजेच 100 वा भाग पार पडत असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि विशेष करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात‘च्या माध्यमातून देशवासीयांशी गेल्या काही काळापासून बोलत आहेत. ते जनतेपर्यंत पोहतच आहेत. ते ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून जनतेच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतात. त्यांच्या या रेडिओ कार्यक्रमाचे आता शतक होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे शतक म्हणजेच 100 वा भाग पार पडत असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि विशेष करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी देशभरातून विशेष आणि उल्लेखनिय काम करणाऱ्या 100 जणांना बोलविण्यात आले आहे. तर यावेळी मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित केला जाणार आहे. या विशेष कार्यक्रमाला राज्यातून 9 जणांची निवड करण्यात आली असून त्यांनी विशेष आमंत्रण देखील देण्यात आलं आहे.

Published on: Apr 27, 2023 09:58 AM
1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; पाहा काय कारण?
किसान लॉंगमार्चचा धांदरफळमध्ये मुक्काम; पावसाची हजेरी, मोर्चेक-यांची ‌धांदल