पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर शरद पवार गरजले; म्हणाले, ‘पूर्ण सत्ता वापरा, आमचा पाठिंबा’
त्यांनी प्रमुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घोटाळ्याचे आरोप केले होते. तर पवार यांना त्यांच्या मुलीचं कल्याण करायचंय असे म्हणाताना राष्ट्रवादीवर 70 कोटी रूपयांचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला आणि अजित पवार यांनी बंड केलं.
नाशिक (येवला) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या पाटण्यात झालेल्या बैठकीवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी प्रमुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घोटाळ्याचे आरोप केले होते. तर पवार यांना त्यांच्या मुलीचं कल्याण करायचंय असे म्हणाताना राष्ट्रवादीवर 70 कोटी रूपयांचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला आणि अजित पवार यांनी बंड केलं. याचबरोबर त्यांनी आपल्याबरोबर 9 आमदारांचा शपथविधी घडवून आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यावरूनच शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा आखत छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच पहिली सभा घेतली. तसेच बंडखोरी करण्याऱ्यांवर निशाना साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हानच दिलं. यावेळी मोदी यांनी केलेल्या आरोपांवर पवार यांनी आव्हान करताना, जर आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारामध्ये सहभागी असेल तर असेल नसेल ती सत्ता वापरा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा, सखोल प्रकरणात जा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेला असेल पाहिजे ती सजा द्या, आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे असे म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून यावर कोणतं उत्तर येत हे पहावं लागणार आहे.