‘…सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले’; शिंदे यांची ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

| Updated on: Jun 24, 2023 | 3:53 PM

देशातील महत्वाचे 15 पक्ष यात सामिल झाले होते. यावेळी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील सहभागी झाली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांची पटना येथे बैठक पार पडली. यावेळी देशातील महत्वाचे 15 पक्ष यात सामिल झाले होते. यावेळी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील सहभागी झाली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांनी ट्विट करत ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणारे उद्धव ठाकरे काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले असा घणाघात केला आहे. तर सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत असेही त्यांनी म्हटलं आहे. तर सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 24, 2023 03:53 PM
उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना इशारा; म्हणाले, ‘तुम्हाला शवासन…’
cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदार बांगर काय बोलून गेले? का रंगली आही इतकी चर्चा?