‘इंग्रजांनाही टिळकांनी खडसावलं, त्यांच्या भारताबद्दलच्या ‘त्या’ धारणेलाही तोडलं’: पंतप्रधान मोदी
याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुरस्काराला उत्तर देण्याताना लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आणि टिळक परिवारातील सदस्य उपस्थित होते. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुरस्काराला उत्तर देण्याताना लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले. यावेळी मोदी यांनी, टिकळ यांनी देशाच्या स्वातंत्र्याची पुर्ण दिशाच बदलली. तर इंग्रजांना असणारा भारतीयांबद्दलचा भ्रमही तोडला. तर त्यांनी स्वातंत्र हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी घेणारच हे ठणकावून देखी सांगितलं. त्यामुळेच देशाच्या जनतेनं त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली. इतकच काय तर महात्मा गांधी यांनी देखील त्यांच्या कार्याची दखवल घेऊन त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं. तर आपण कल्पना करू शकतो कि टिळक यांचे चिंतन, त्याचं व्हिजन दुरदर्शी होतं. तर भारतीय स्वातंत्र्याच्या काळातील स्वर्ण अध्याय हा लाल-बाल-पाल होता असेही मोदी यांनी म्हटलं आहे.