पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! बहुप्रतिक्षित मेट्रो येणार पुणेकरांच्या दिमतीला; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

| Updated on: Jul 31, 2023 | 2:31 PM

तर ही फक्त वाढदिवस करण्यासाठी का असा सवाल पुणेकरांसह राजकीय नेत्यांनी केला होता. तर यावरून सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील टीका केली होती. पण आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आली असून आता दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो पुणेकारंच्या दिमतीला येणार आहे.

पुणे, 31 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून पुण्यातील मेट्रोही टीकेची धनी ठरली होती. तर ही फक्त वाढदिवस करण्यासाठी का असा सवाल पुणेकरांसह राजकीय नेत्यांनी केला होता. तर यावरून सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील टीका केली होती. पण आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आली असून आता दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो पुणेकारंच्या दिमतीला येणार आहे. गरवारे कॉलेज ते वनाझ व पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो धावणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गावरील उर्वरित चार मेट्रो स्थानकांचे आणि वनाज ते रामवाडी या मार्गावरील सात मेट्रो स्थानकांचे 1 ऑगस्टला उद्घाटन होणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता पुणे व पिंपरी चिंचवडकरांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तर पुण्यातील काही अंशी ट्रॅफिकची समस्याही कमी होणार आहे. तर पंतप्रधान मोदी हे लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत.

Published on: Jul 31, 2023 02:31 PM
बुलढाण्यात राष्ट्रवादी आक्रमक; संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!
“संभाजी भिडे यांच्यासारख्या माणसांना पुढे करून भाजप समाजातलं संतुलन बिघडवतेय”, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल