पंतप्रधानांच्या उक्ती आणि कृतीत फरक, काय म्हणाले शरद पवार ?

| Updated on: Aug 17, 2024 | 3:04 PM

पंतप्रधान याच्या उक्ती आणि कृतीत फरक असून ते बोलल्याप्रमाणे वागत नसल्याची टिका राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रचंड टिका केलेली आहे. एकीकडे पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन 15 ऑगस्टचे भाषण करताना म्हणतात की एक देश आणि एक निवडणूक आणि हे बोलून 12 तास होत नाहीत तोवर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू आणि कश्मीर तसेच हरियाणा या राज्याच्या निवडणूका जाहीर होतात. परंतू महाराष्ट्र आणि झारखंड राज्याची निवडणूका मात्र जाहीर केल्या जात नाहीत.हा एक प्रकाराचा विरोधाभास आहे. देशात सध्या शांततेची गरज आहे.बांग्लादेशातील घटनेचे येथे महाराष्ट्रात गोंधळ घालण्याचे कारण काय ? या आधी महाराष्टात असे कधी घडलेले नाही. समाजातील सगळ्याच घटकांनी याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन देखील शरद पवार यांनी केली आहे.

Published on: Aug 17, 2024 03:02 PM
सरकारी कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या लाडक्या बहीणींचे अर्ज बाद?, काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
‘या सर्व योजना चालू ठेवायच्या की नाही….,’ काय म्हणाले अजितदादा