काका-पुतण्याच्या भेटीवर चर्चांना उधाण; काँग्रेस नेता म्हणतो, राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता?

| Updated on: Aug 13, 2023 | 8:25 AM

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील तिथे होते. तर काका-पुतण्यामध्ये चर्चा झाल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. तर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता या भेटीवर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावरूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 13 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील तिथे होते. तर काका-पुतण्यामध्ये (Ajit Pawar Meets Sharad Pawar) चर्चा झाल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. तर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता या भेटीवर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावरूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण यांनी, शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट आता गुप्त राहिलेली नाही. त्याचे फोटो आणि व्हिडीओ माध्यमांकडे आहेत. तर पक्ष फुटीनंतर दोन्ही नेते भेटत असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वातावरण बनत आहे. कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे नक्की काय सुरू आहे हे दोघांनी सांगितलं पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर होईल, असंही चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Published on: Aug 13, 2023 08:25 AM