“राज्य सरकारने प्रदीप कुरुलकरची सखोल चौकशी करावी,” पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरप्रकरणी विधानसभेत आज पडसाद उमटले. काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुरुलकरविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारला प्रश्न विचारले.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरप्रकरणी विधानसभेत आज पडसाद उमटले. काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुरुलकरविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारला प्रश्न विचारले. ते म्हणाले की, “कुरुलकर यांच्यावर केंद्रीय गुप्तहेर खात्याचे कारवाई केली आहे. त्यांनी पकिस्तानी गुप्तेहरांना माहिती पुरवली असून त्यांच्याविरोधात कोर्टात खटला सुरू आहे. ज्या महिलेला माहिती दिली ती पाकिस्तानची गुप्तहेर होती. त्या महिलेसोबत यांनी भारत-पाकिस्तान मॅच पाहिल्याचं स्पष्ट झालं.दरम्यान कुरुलकर यांनी ‘ब्रह्मोस’बाबत माहिती शत्रुराष्ट्राला दिली. हा उच्चपदस्थ अधिकारी आहे. त्यांनी बरीच गुप्त माहिती दिली आहे. चॅटमध्ये ते म्हणाले होते की, आणखी माहिती देतो. त्यांनी अश्लिल चॅट केलं. मात्र त्यांच्याविरोधात फक्त ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा दखल झाला आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल का झाला नाही?”