जातीयवादी पक्षांना रोखण्यास महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग : पृथ्वीराज चव्हाण
कसब्यात महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा महत्वाचा होता. गेली 35 वर्षे भाजपकडे असणारा मतदार संघ आता मविआकडे आल्याने एकच जल्लो, करण्यात आला होता.
मुंबई : काही दिवसांपुर्वीच पुण्यातील कसबा व चिंचवड पोटनिवडणूक पार पडली. यावेळी कसब्यात महाविकास आघाडीनं बाजी मारत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. तर चिंचवड पोटनिवडणूक भाजपने जिंकली. यावेळी कसब्यात महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा महत्वाचा होता. गेली 35 वर्षे भाजपकडे असणारा मतदार संघ आता मविआकडे आल्याने एकच जल्लोष करण्यात आला होता. त्यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना, मविआचा प्रयोग यशस्वी झाला. जातीयवादी पक्षांना रोखण्यास महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे म्हटलं आहे. मविआच्या घटक पक्षांनी आणि नेत्यांनी ही विजश्री खेचून आणली. हा विजय महाराष्ट्राच्या भावी राजकारणासाठी खारच महत्वाची घटना आहे.
Published on: Mar 08, 2023 09:16 AM