Priyanka Chaturvedi | आता हिंदुत्व आठवतंय? मग शिंदेंनी तीन तीन मंत्रीपद कशाला घेतली? खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा पलटवार

| Updated on: Jul 23, 2022 | 5:18 PM

Priyanka Chaturvedi on Shinde Group | आता शिंदे गटाला हिंदुत्वाचा मोठा पुळका आला आहे, पण महाविकास आघाडीत त्यांनी मंत्रीपदे भोगली, तेव्हा ते कुठे होते असा खोचक सवाल चुतर्वेदी यांनी विचारला आहे.

Priyanka Chaturvedi Attacked | आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या बंडखोरांना हिंदुत्व (Hindutva) आठवत आहे. त्यांना हिंदुत्वाचा मोठा पुळका आला आहे. पण महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सत्तेत असताना शिंदे यांनी तीन तीन मंत्रीपदे भोगल्याची आठवण शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनी बंडखोरांना करुन दिली. पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिंदे यांनी केल्याची घणाघाती टिका ही त्यांनी केली. एवढंच नाही तर शिंदे गटातील सर्वच जण गद्दार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शिंदे गटाताली सर्व आमदार अपात्र होतील असा दावा ही त्यांनी यावेळी केला. शिवसेना एकच असून ती ठाकरेचींच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

त्यांच्या या विधानानंतर बंडखोर पुन्हा डिवचले जाणार आहेत. शिवसेनेकडून शिंदे गटावर (Shinde Group) शाब्दिक हल्ले सुरुच असून मध्यंतरी शिवसेनेच्या प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी दोन्ही गट एकत्र येणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता.

लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जातोय – सचिन अहिर
…आताच का तुम्हाला हिंदुत्व आठवलं