Video : राज्यातील सरकार बेकायदेशीर, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास -प्रियंका चतुर्वेदी
महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशीर आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. शिंदे-फडणवीस कितीही बैठका चर्चा दिल्लीमध्ये येऊन करू देत, याबाबत सर्वोच्च न्यायालय न्याय देईल, असा विश्वास शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे. ईडीच्या बळावर तयार झालेले हे सरकार आहे. मुंबईत आज पक्षप्रमुखांनी मुख्य प्रवकत्यांची बैठक बोलावली आहे. पण अधिवेशन सुरू असल्याने मी जाणार नाही. शेवाळे […]
महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशीर आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. शिंदे-फडणवीस कितीही बैठका चर्चा दिल्लीमध्ये येऊन करू देत, याबाबत सर्वोच्च न्यायालय न्याय देईल, असा विश्वास शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे. ईडीच्या बळावर तयार झालेले हे सरकार आहे. मुंबईत आज पक्षप्रमुखांनी मुख्य प्रवकत्यांची बैठक बोलावली आहे. पण अधिवेशन सुरू असल्याने मी जाणार नाही. शेवाळे काही दिवसापूर्वी म्हणत होते की, काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना संपवली. तर मग आदित्य यांच्या निष्ठा यात्रेत एवढी गर्दी कुठून येते? आदित्य यांच्या यात्रेत काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला होता, मग खरं काय आहे? ते स्पष्ट करा. जनतेसमोर येऊ द्यात, असं आव्हान चतुर्वेदी यांनी राहुल शेवाळेंना दिलंय.