…म्हणून चिन्ह आम्हालाच मिळणार; ठाकरे गटाच्या खासदाराला विश्वास

| Updated on: Jan 30, 2023 | 12:56 PM

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरेगटालाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. पाहा त्या काय म्हणाल्या आहेत...

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरेगटालाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. ‘पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. शिंदे गटाचे आमदार आणि खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडून आलेत.त्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळेल”, असा विश्वास प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलाय. तसंच रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केलाय. “गद्दारांच्या तोंडून गद्दारीचीच भाषा येणार. 50 खोक्यासाठीचं हे शिंदे गटात गेले असतील. 2024 तर सोडा पण याच वर्षात हे सरकर पडणार आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

Published on: Jan 30, 2023 12:56 PM
अरे बाप रे… उर्फी जावेदने ‘त्या’ ट्विटवरून कंगनाला फटकारले
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आंदोलन; पाहा काय आहेत मागण्या?