१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल

| Updated on: Nov 16, 2024 | 3:12 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राहुल गांधी यांच्या सभा झाल्या आहेत. शिर्डी येथे कॉंग्रेसच्या प्रियंका गांधी यांची सभा झाली. यासभेत प्रियंका गांधी यांनी वाढत्या महागाई वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या अंतिम टप्प्यात कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची शिर्डी येथे सभा झाली आहे. या सभेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.त्या पुढे म्हणाल्या की मोदी म्हणतात अब आतंक नही है. परंतू महागाईचा आंतक तुमच्यावर सोडला आहे. त्याचे काय? तुम्हाला १५०० रुपये लाडकी बहिण म्हणून देत आहेत. परंतू त्याबदल्यात तुमच्याकडून घेत किती आहेत. तुम्हाला यावेळेची दिवाळी देखील धड साजरी करता आलेली नाही. इतकी महागाई वाढवून ठेवली आहे. दहा वर्षे केंद्रात यांचे सरकार आहे. महाराष्ट्रात अडीच वर्षे सरकार आहे तर यांनी गॅसचे दर कमी केलेले नाहीत. सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतकरी नाराज आहेत.आता निवडणूकीच्या तोंडावर १५०० रुपये दिले जात आहेत. परंतू त्याबदल्यात तुमच्याकडून घेतले किती जात आहेत.याचा काही हिशेब आहे की नाही असा सवालही प्रियंका गांधी यांनी यावेळी केला.

Published on: Nov 16, 2024 03:12 PM
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार पाडले, राहुल गांधी यांचा आरोप