Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray | नवहिंदुत्ववादी उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांचीच बाजू घेत आहेत
नवहिंदूत्ववादी उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांचीच बाजू घेत आहेत. दाऊदशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या मंत्र्यांना हे पाठीशी घालत आहेत, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
मुंबई : येत्या 14 मेला मुंबईतील बीकेसीतील मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray) तोफ धडाडणार आहे. शिवसेना (Shivsena) बीकेसीतल्या हुंकार सभेपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरूवात करणार आहे. या सभेकडे अनेकांच्या नजारा लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. हिंदूत्व (Hindutva), हनुमान चालीसा, नवनीत राणा, रवी राणा, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अशा विविध मुद्द्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. शिवसेने सत्तेसाठी हिंदूत्व सोडलं, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, शिवसेना ही जनाबसेना झाली आहे. अशी टीका वारंवर भाजपकडून होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बीकेसीतल्या सभेतून उत्तर देणार आहेत. मात्र या सबेआधी राज्यातील भाजप नेत्यांनी या सभेवरून मुख्यमंत्री आणि शिवसेनाला काही खोचक सवाल विचारण्यास सुरूवात केली आहे. आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याच सभेवरून मुख्यमंत्र्यांना पाच सवाल केले आहेत. तसेच त्यांनी नवहिंदुत्ववादी उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांचीच बाजू घेत आहेत अशी टीका केली आहे. नवहिंदूत्ववादी उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांचीच बाजू घेत आहेत. दाऊदशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या मंत्र्यांना हे पाठीशी घालत आहेत, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.