Jogendra Kawade | ठाकरेंना निवेदन देऊनही दखल घेतली नाही, शिंदे गटासोबतच युती करण्याचं पक्षाचं मतं

| Updated on: Jan 04, 2023 | 4:05 PM

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती केल्याचे जाहिर करत ठाकरे यांच्यांवर टीका केली. तसेच त्यांनी आपल्या निवेदनाला साधी पोच देखिल नाही असा आरोप केला आहे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कवाडे यांनी आपली प्रतिक्रीया देताना, याच्याआधी ठाकरेंना निवेदन देऊनही दखल घेतली नाही. मात्र बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत पीआरपीचाही समावेश झाल्याचे त्यांनी म्हटलं.

यावेळी कवाडे यांनी आपली भूमिका मांडताना राज्यात आलेलं शिंदे -फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांच असल्याचं म्हटलं आहे. तसेच जर युती करण्याचं झालंच तर ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी करायच असा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितलं.

यावेळी कवाडे यांनी तक्तालिन मुख्यमंत्री ठाकरे यांनी चारवेळी निवेदन देऊनही भेट दिली नाही. किंवा दिलेल्या निवेदनाची साधी पोच देखिल दिली नसल्याचे म्हटलं आहे. तर आम्ही काय करणार आहोत याची साधी दखल ही घेतली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jan 04, 2023 04:05 PM
Ajit Pawar Live | स्वराज्यरक्षणात अनेक गोष्टी येतात, वादग्रस्त विधान माझं नाहीतर राज्यपालांचं
Ajit Pawar | सर्व घडवणारा मास्टर माईंड सभागृहात नव्हता : अजित पवार