Sanjay Raut : प्रचाराचं महत्त्व फार आहे, तुम्ही कश्या प्रचार करता त्यावर तुम्ही लोकांची मन जिंकू शकता – संजय राऊत
एका निवडणुकीत हिटलरच्या विरोधात प्रचंड प्रचार झाला. त्यावेळी हिटलर म्हणाला, आपण एक पोस्टर लावायचे. त्यात कोणत्याही घोषणा नको. केवळ हिटलरचा फोटो लावला. ते लोकांना आवडले. त्या प्रकारचे इव्हेंट मोदी आणि त्यांचा पक्ष करत आहे.
मुंबई – हिटलरचे एक आत्मचरित्र आहे, माईन काम्प(Mine Camp) यात त्याने सांगितले, की राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रपोगंडा आणि प्रचाराचे महत्त्व फार आहे. तुम्ही कशा प्रकारे प्रचार आणि प्रपोगंडा करता ते महत्त्वाचे आहे. आज आपल्या देशात तेच सुरू आहे. एका निवडणुकीत(Election ) हिटलरच्या विरोधात प्रचंड प्रचार झाला. त्यावेळी हिटलर म्हणाला, आपण एक पोस्टर लावायचे. त्यात कोणत्याही घोषणा नको. केवळ हिटलरचा फोटो लावला. ते लोकांना आवडले. त्या प्रकारचे इव्हेंट मोदी (Modi )आणि त्यांचा पक्ष करत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.
Published on: May 08, 2022 05:33 PM