आपले मुख्यमंत्री जगभर प्रसिद्ध!; वाढदिनी अजित पवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते काय म्हणालेत पाहा...
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या. आपली परंपरा आहे , सुखद-दुख:द प्रसंगामध्ये एकमेकांना आधार द्यावा. त्यानुसार आज सकाळी एकनाथ शिंदे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा व्हीडिओ टाइम्स स्केअरवर पण पाहायला मिळाला. आपले मुख्यमंत्री जगभर प्रसिद्ध आहेत, असं अजित पवार म्हणालेत.
Published on: Feb 09, 2023 01:40 PM