पुण्यात गारपीट, फळबागा-पिकांचं मोठं नुकसान; शेतकऱ्यांच्या खिशाला फटका

| Updated on: Mar 07, 2023 | 1:23 PM

Pune Unseasonal Rain Update : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर अवसरी परिसरात काल रात्री उशीरा जोरदार गारपीटी झाली. या गारपीटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात आणि अंगणात अक्षरश: गारांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. पाहा व्हीडिओ...

पुणे : सध्या वातावरणात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. पुणे जिल्ह्यातही अवकाळी पाऊस कोसळतोय. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर अवसरी परिसरात काल रात्रीच्या सुमारास जोरदार गारपीटी झाली. अचानक पडलेल्या गारपीटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात आणि अंगणात अक्षरश: गारांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. या गीरपीटीने बळीराजा चं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालंय. गारपिटीच्या या पावसाने बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा यांसह द्राक्ष, डाळिंब यांसारख्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

Published on: Mar 07, 2023 01:23 PM
औरंगाबादचं नामांतर, लढा अन् एमआयएमचं उपोषण; मंत्री संदिपान भुमरे यांची सविस्तर प्रतिक्रिया, पाहा…
अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाच्या सूचना, पाहा…