उद्धवसाहेब, तुम्ही हिंदू धर्मातील एका जातीचा वारंवार अपमान करत आहात!; ठाकरेंवर टीकास्त्र

| Updated on: Apr 03, 2023 | 1:26 PM

हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला स्वतःला सांगावं लागत आहे. सिद्ध करावं लागत आहे, हेच दुर्दैवी आहे. ते करत असतानाच तुम्ही एका जातीला वारंवार बदनाम करण्याचं पाप पण करत आहात, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव साहेब तुम्ही हिंदू धर्मातील एका जातीचा वारंवार अपमान करत आहात”, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. शेंडी, जानवंवाल्यांबरोबरच तुमचा घरोबा आहे हे विसरू नका. माझ हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही,हे वाक्य तुम्ही प्रत्येक वेळेस वापरत आहात. या विधानाचा आम्ही निषेध करत असतानाच तुम्ही त्याच कुळातील आहात हे सुद्धा स्पष्ट करतो. ठाकरे घरात आलेल्या मुली आणि ठाकरेंनी दिलेल्या मुली कोणत्या घरात गेल्या आहेत हे जरा आठवा, स्वतः च्या सोयरीकी जाहीर करा. आत्यांची आडनावं सांगा, सुनांची-व्याहांची आडनावं सांगा, असं आव्हान आनंद दवे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

Published on: Apr 03, 2023 01:22 PM
कशाला बडे जाऊपणाने सांगता? तो निर्णय तर केंद्राचा; छ. संभाजीनगरवरून बावनकुळेंची टीका
संजय राऊत यांची बोलण्याची पातळी घसरतेय; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य