Pune Big News : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
Vasant More Son Death Threat : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आलं आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवत फसवणूक करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अल्फिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करण्यात आला आणि वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश मोरे याला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
Published on: Mar 07, 2023 10:25 AM