पुणे भाजपला नवे शहराध्यक्ष मिळण्याची शक्यता; ‘ही’ पाच नावं चर्चेत…

| Updated on: Mar 08, 2023 | 9:31 AM

मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांने केली होती. मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस पुण्यातील भाजपा कार्यकारिणीत बदल होण्याचे संकेत आहेत.

पुणे : पुणे शहर भाजपच्या कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या महिनाअखेरपर्यंत बदलांची शक्यता आहे. पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार? की भाजप पुन्हा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनाच संधी देणार हे पाहणं महत्वाचं असेल. पुणे शहर ,जिल्हा कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी नियुक्ती होते. मुदत संपली असल्यानं या महिना अखेरीस बदल होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, गणेश बीडकर, धीरज घाटे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व कुणाला संधी देणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

Published on: Mar 08, 2023 09:31 AM
जातीयवादी पक्षांना रोखण्यास महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग : पृथ्वीराज चव्हाण
पहिला अभिमान वाटला पाहिजे आपण भारतीय आहोत – अजित पवार