पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं काम अंतिम टप्प्यात; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी
Pune Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौक पुलाचं 1 मेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्याआधी उजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
पुणे : पुण्यातील चांदणी चौक पुलाचं काम सध्या वेगाने सुरू आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चांदणी चौकातील या कामाचा आढावा घेतला. चांदणी चौक पुलाचे 1 मेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कामाचा आढावा घेतल्यानंतर राजेश देशमुख यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “चांदणी चौक पुलाचे 86 टक्के काम पूर्ण झालं आहे. येत्या मे महिन्यापर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. 1 मेला उदघाटन होणार असल्यामुळे आज मी या कामाचा आढावा घेतला. सध्या चांदणी चौकातील 6 लेन सुरू आहेत. पुलाचं उदघाटन झाल्यावर अजून 2 लेन सुरू होणार आहेत. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूककोंडी 100 टक्के मिटणार आहे”, असं राजेश देशमुख म्हणाले.
Published on: Mar 15, 2023 03:34 PM