पुन्हा जोमाने कामाला लागा!; चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना
शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहा...
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा जोमाने कामाला लागण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट आणि कसबा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. या भेटीत कार्यकर्त्यांना संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
Published on: Mar 05, 2023 03:04 PM