संजय राऊत यांची बोलण्याची पातळी घसरतेय; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Apr 03, 2023 | 1:47 PM

Chandrakant Patil on Sanjay Raut : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले आहेत? पाहा...

पुणे : भाजपचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांची बोलण्याची पात्रता खाली चालली आहे. आपण कोणाबद्दल बोलतोय? काय बोलतोय? याचं त्यांना भान नाही. नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना जगभरात उच्च स्थान मिळालं आहे. त्यांच्याबद्दल आपण काय बोललो पाहिजे, हे राऊतांना समजायला हवं, संजय राऊत यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे. त्यांच्याबद्दल सध्या नकारात्मक भावना तयार होत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. ते पुण्यात बोलत होते.

Published on: Apr 03, 2023 01:46 PM
कशाला बडे जाऊपणाने सांगता? तो निर्णय तर केंद्राचा; छ. संभाजीनगरवरून बावनकुळेंची टीका
पंतप्रधानांनी त्यांचा 2014 ला करिष्मा दाखवला; पदवीवरून अजित पवारांचा टोला