पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर पुणे पोलिसांनी घेतली कोणती खबरदारी? काय केलं?

| Updated on: Jun 11, 2023 | 9:49 AM

खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पवारांना काही झाल्यास त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुळे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता शरद पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा दाभोळकर होणार, असं या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पवारांना काही झाल्यास त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुळे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता शरद पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तर धमकीच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून पुणे शहर पोलिसांनी पावले उचलली आहेत. पुणे शहर पोलिसांनी शरद पवार यांच्या दौर्‍याच्या वेळी पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. तसेच पवार यांचे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अतिरिक्त पोलीस कर्मचारी ठेवण्यात येणार आहेत. तर पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या परिसरात देखील चोख बंदोबस्त ठेवत त्यातही वाढ करण्यात आली आहे.

Published on: Jun 11, 2023 09:49 AM
नाराजी ते सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर अजित पवार यांनी व्यक्त केलं थेट मत; म्हणाले, ‘यापुढेही मी…’
‘हेच का तुमचे….’, अमोल मिटकरी यांचा टि्वट करत भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा