देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र धंगेकर यांना आक्षेप; थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार
निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं आणि त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावर निवडणूक आयोगानी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता भंग केल्यचा आकोर कर धंगेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा फडणवसांकडून प्रयत्न झाल्याचं धंगेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता भंग केला. त्यांनी तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
Published on: Mar 02, 2023 08:57 AM