विजयाचं श्रेय कुणाचं? रविंद्र धंगेकर यांची टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया
Kasba Assembly Election Result 2023 : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मागची 28 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघाला आता सुरुंग लागला आहे.
पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल काहीवेळाआधी समोर आला आहे. यात काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्याने विजय खेचून आणला. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी टीव्ही 9 मराठीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो. त्यांनी माझ्या पारड्यात मतरूपी आशिर्वाद टाकले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी विजयी झालो. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं धंगेकर म्हणालेत. शिवाय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचेही त्यांनी आभार मानलेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीचं काम केलं. त्यामुळे हा विजयाचा दिवस पाहता आला. त्यांचे मनापासून आभार. या विजयाचं श्रेय जनता आणि महाविकास आघाडीचं आहे, असंही धंगेकर म्हणाले.
Published on: Mar 02, 2023 12:37 PM