पुण्यातील धायरी परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Mar 15, 2023 | 9:27 AM

Pune Fire News : पुण्यातील धायरी परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. फर्निचर, वाहन दुरुस्तीचे साहित्य, रंग स्प्रे बनवण्याच्या 6 कारखान्यांना आग लागली. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यातं आलं आहे.

पुणे : पुण्यातील धायरी परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. धायरीतील गणेश नगरमधल्या गल्ली क्रमांक 22 मधल्या एका कारखान्यात ही आग लागली आहे. आग लागली तेव्हा कंपनीत मोठे स्फोट झाले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोट पाहायला मिळाले. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची 10 वाहनं दाखल घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे अतोनात प्रयत्न केले. या आगीत विविध प्रकारचे 6 छोटे कारखाने जळून खाक झालेत. घटनास्थळी सिलेंडरचे आणि केमिकल बॅरलचे 8-10 स्फोट झाले आहेत. पुणे आणि पीएमआरडीएच्या 10 वाहनांच्या साह्याने जवानांनी आग पूर्ण विझवली आहे. या आगीत कुणीही जखमी झालेलं नाही. तसंच जिवितहानीही झालेली नाही.

Published on: Mar 15, 2023 09:27 AM
शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकारीही कंत्राटी; राज्य सरकारकडून हालचाली सुरू
राज्यातील सत्तासंघर्षातील सुनावणीबाबत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; सुनावणी पूर्ण होणार?