कसबा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल

| Updated on: Feb 27, 2023 | 11:05 AM

कसबा पोटनिवडणुकीसाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा नेमकं कारण काय आहे?

पुणे : पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. कसबा पोटनिवडणुकीसाठीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत रासने मतदान केंद्रात जाताना भाजपचं उपरणं घालून गेल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अन् रासने यांच्या विरोधात या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप रासने यांच्यावर ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी आता रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Feb 27, 2023 10:37 AM
मंत्रालयाजवळचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची 100 प्रकरणं टपाटप खाली पडतील- संजय राऊत
आधी हेमंत रासने अन् आता रविंद्र धंगेकर, पुण्यातील पोटनिवडणुकीत FIR चा ट्विस्ट, पाहा…