Pune मध्ये पारगे नगरमधील एका गोडाऊनला आग

| Updated on: Apr 26, 2022 | 8:08 PM

पुण्यातील कोंढवे भागातील पारगे नगर येथे येथे एका गोडाउनमधे आग लागली आहे

पुणे : पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस आगीच्या (Pune Fire) घटना वाढत चालल्या आहेत. कधी रुग्णालयाला आग तर कधी रहिवाशी इमारतीला आग, अशा घटना वारंवार घडत असल्याने पुणेकरांची डोकेदुखी सध्या चांगलीच वाढली आहे. कधी कधी तर बाजारपेठेतल्या दुकानाला तर कधी कचरा डेपोत आग लागण्याच्या घटनाही घटत आहे. त्यामुळे या आगींवर कसे नियंत्रण मिळवावे याबाबत फायर ब्रिगेड (Fire Brigade) आणि महापालिका प्रशासन उपाययोजना आखत आहे. मात्र तरीही या आगीच्या घटना नियंत्रणात येताना दिसान येत नाहीत, कारण आज पुन्हा पुण्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.

Published on: Apr 26, 2022 07:46 PM
Aaditya Thackeray Meet Ashwini Vaishnaw : आदित्य ठाकरे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या भेटीला
Gunaratna Sadavarte Get Relief : 18 दिवसांच्या कोठडीनंतर सदावर्तेंची सुटका, बाहेर येऊन काय म्हणाले!