गिरीश बापट यांच्यावर काल अंत्यसंस्कार; आज जनसंपर्क कार्यालय सुरू
Girish Bapat : गिरीश बापट यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर रोजच्या वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सामान्य लोकांसाठी सुरू ठेवण्यात आला आहे.
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं काल निधन झालं. त्यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार होऊन 24 तास उलटण्याच्या आतच गिरीश बापाचा जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. रोजच्या वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सामान्य लोकांसाठी सुरू ठेवण्यात आला आहे. काल दुपारी गिरीश बापट यांचं निधन झालं असून काल रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 24 तासाच्या आतच गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. त्यासोबतच जनसंपर्क कार्यालयातील दैनंदिन कामे देखील सुरू ठेवण्यात आली आहेत. काहीही झालंतरी लोकांची कामं महत्वाची, त्यांचे प्रश्न सोडवणं महत्वाचं, असं यावेळी सांगण्यात आलं आहे.